+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Nov 22 person by visibility 293 categoryमहानगरपालिका
राजेश क्षीरसागरांच्या महापालिका अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरात भुयारी गटर योजना अस्तित्वात आणून शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर मलनिस्सारण प्रकिया करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ तयार करून सरकारकडे सादर करावा. सरकार दरबारी पाठपुरावा करून निधी मंजुरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
पंचगंगा नदी, रंकाळ्यासह इतर तलावांची प्रदूषण मुक्ती आणि शहरातील गंभीर ड्रेनेज लाईनच्या प्रश्नाबाबत शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
शहरातील बहुतांश ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही. महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईनचा प्रभाग निहाय आढावा घेवून १०० टक्के सांडपाण्यावर मलनिस्सारण प्रकिया करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तयार करून अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून निधी मागणीचा प्रस्ताव सरकारकडे सादर करावा, अशा सूचना केल्या.
बैठकीस कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पाणीपुरवठा विभागाचे आर.के.पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, रियाज बागवान आदी उपस्थित होते.
……………….
रंकाळा तलाव संवर्धनासाठी तेरा कोटीचा प्रस्ताव
“शहरात ऐतिहासिक रंकाळा तलावासह कोटीतीर्थ, राजाराम, लक्षतीर्थ अशा तलावांसह अनेक खणींच्या माध्यमातून जलसमृद्धी अस्तित्वात आहे. या जलसाठ्यांच्या आजूबाजूचा परिसर विकसित होताना या परिसरातील सांडपाणी जलसाठ्यात मिसळून तलावांचे आणि खणींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या जलसाठ्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारून तलाव आणि खणींना मूळ स्वरूप प्राप्त करून देणे गरजेचे आहे. रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी १३ कोटींचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यापद्धतीने इतर जलसाठांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. रंकाळ्यासह इतर जलसाठांच्या संवर्धनाचे प्रस्ताव यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून नगरविकास विभागाकडून निधी मंजुरी साठी सर्वतोपरी प्रयत्न करू.”