+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !! adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा! adjustखासदार धैर्यशील मानेंचा कोडोलीत दौरा : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद adjustकोरे अभियांत्रिकीत युरेका जिज्ञासा २के २४ चे दिमाखात उद्घाटन adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको ? आमदार सतेज पाटलांचा मंडलिकांना सवाल adjustराधानगरीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले शाहू छत्रपतींच्या विजयासाठी -अभिजीत तायशेटे adjustफ्रान्समधील स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पाच खेळाडूंची निवड adjustसंजय मंडलिकांना विजयी करण्यास शहरवासीय सज्ज- राजेश क्षीरसागर
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Jan 23 person by visibility 506 categoryउद्योग
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गणला जाणारा दुग्ध व्यवसाय आता प्रमुख व्यवसाय बनलेला आहे. या क्षेत्रामध्ये व्यवसाय व रोजगाराच्या विपुल संधी आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा ठरलेल्या दुग्ध व्यवसायाचे मार्केट हे भविष्यकाळात ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातीच राहिले पाहिजे. सध्या भेडसावणाऱ्या अडचणी, भविष्य काळातील संकटे यावर मात करत दुग्ध व्यवसायाला शाश्वत आणि स्थिरता प्रदान करणारा दिशादर्शक प्रकल्प दूध परिषदेमधून घडावा. संपूर्ण दुग्ध व्यवसायिकांची दूध परिषद ही वारी बनावी." असा सूर कोल्हापुरात झालेल्या दूर परिषदेमध्ये उमटला.
पश्चिम भारत व महाराष्ट्रातील खाजगी आणि सहकारी दूध संघानी एकत्र येऊन तीन दिवसीय इंडियन डेअरी फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या फेस्टिवल अंतर्गत हॉटेल सयाजी येथे शुक्रवारी सकाळी दूध परिषद झाली. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी मंत्री व आमदार सतेज पाटील म्हणाले," पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय हा आज प्रमुख व्यवसाय बनलेला आहे. या व्यवसायाचे मार्केट शेतकऱ्यांच्या हातात आहे, भविष्य काळात सुद्धा दुधाचे मार्केट शेतकऱ्यांच्या हाती राहिले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या बळावर सर्व क्षेत्रात प्रगती झाली आहे. तेव्हा भविष्यातील दुग्ध व्यवसायासमोरील अडचणी ओळखून नव तंत्रज्ञानाचा अवलंब करत दूध व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. दुग्ध व्यवसायाला संयुक्तपणे बळ देण्याची गरज आहे." 
   दूध व्यवसाय व भविष्यकाळातील धोरणे या अनुषंगाने बोलताना आमदार पाटील म्हणाले, " भारताच्या एकूण आर्थिक उत्पन्नात पाच टक्के वाटा दुग्ध व्यवसायाचा आहे. यावरून या व्यवसाय वाढीसाठी किती मोठी संधी आहे लक्षात येते. दुधाची मागणी कधीही कमी होणार नाही हे पक्के आहे. दुधाच्या उत्पादन वाढीसाठी, दुग्ध व्यवसायाला सरकारी पातळीवरून बळ देण्याचे धोरण गरजेचे आहे. दुग्ध व्यवसायाला शाश्वतपणा व स्थिरता प्राप्त होण्याच्या अनुषंगाने धोरणांची अंमलबजावणी हवी. सरकारने पहिल्यांदा पशुधनांची गणना करावी. जनावरांना संतुलित आहार, ज्यादा दूध येणाऱ्या जनावरांचे प्रजनन यासाठी दूध संस्था, एनडीडीबी आणि सरकारचा दुग्ध विभाग संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे. दुग्ध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली पाहिजे. लोकांच्या उपजीविकेचा हा प्रमुख व्यवसाय आहे.त्यांच्यासमोर नव्या गोष्टी नव्या संकल्पना मांडायला हव्यात. दुधात होणारी भेसळ हा व्यवसाय समोरील आव्हान आहे. काही जिल्ह्यांमध्ये पशुधनांची संख्या कमी आहे मात्र तीन ते चार लाख लिटर दूध संकलन होते हे दूध नेमके येथे कुठून हा संशोधनाचा विषय आहे यासाठी सरकारी पातळीवरून पशुधनाची गणना महत्त्वाचे आहे."
 या फेस्टिवलचे प्रमुख संयोजक व गोकुळच्या संचालक चेतन नरके म्हणाले,"इंडियन डेअरी असोसिएशनतर्फे आयोजित दूध परिषद ही व्यवसायिकांची वारी बनावी. दुग्ध व्यवसाय आणि माझे नाव माझे जन्मापासून जोडलेली आहे. माझे वडील व गोकुळचे माजी चेअरमन होणार केनी ५० वर्षांमध्ये काळ दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी खर्ची घातले. त्यांच्या विचार कार्याचा वारसा पुढे चालविण्याचे अनुषंगाने मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. नवीन तंत्रज्ञान अत्याधुनिक सेवा सुविधा या बळावर नव्याने श्वेतक्रांती घडविण्याची वेळ आहे. दुग्ध व्यवसाय आज वेगवेगळ्या कारणाने संकटात आहे नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती महापूर, जनावरांना होणाऱे आजार अशी वेगवेगळी संकटे आहेत. मात्र दुग्ध व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या सगळ्या घटकांची साथ लावल्यामुळे दूध परिषद ही दुग्ध व्यवसाय वाढीसाठी एक प्रमुख चळवळ ठरणार आहे. दुग्ध व्यवसायमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी आहेत."
 चितळे डेअरी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक विश्वास चितळे यांनी आभार मानले. व्यासपीठावर गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, कात्रज दूर संघाच्या केशर पवार, वारणा दूध संघाचे एच आर जाधव, सहकार आणि पणन विभागाचेपरमुख सचिव अनुप कुमार, प्रभात डेअरीचे राजू मित्रा एनडीडीबीचे निरंजन कराडे आणि गोकुळचे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले, यळगुड दूध संस्थेचे सुजितसिंह मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. महेंद्र कुलकर्णी व शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. 
.......................
 म्हणून चेतन नरकेंना बळ देण्याची भूमिका
आमदार सतेज पाटील म्हणाले, " दुग्ध व्यवसाय वाढीसाठी चेतन नरके हे मनापासून काम करत आहेत. हा व्यवसाय वाढला पाहिजे ही त्यांची धारणा आहे. त्यांना दुग्ध व्यवसायविषयी तळमळ आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास आहे. दुग्ध व्यवसायाला वैभव मिळवून देण्यासाठी चेतन नरके धडपडत आहेत. त्यांच्या चांगल्या गोष्टींना पाठिंबा आहे."माझी चेअरमन अरुण नरके यांनीही चेतन नरके यांच्या कामकाजाचे कौतुक केले.