महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शैक्षणिक पर्यवेक्षक म्हटले की शाळेला अचानक भेट, शाळा तपासणी असं काम ठरलेलं. बहुतांश ठिकाणी हेच चित्र नजरेस पडते. तथापि महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांनी वाढदिवसानिमित्त रावबहादूर विचारे विद्यामंदिर शाळेसाठी अँड्रॉइड टीव्ही भेट दिला. यावेळी माजी शिक्षण सभापती वनिता देठे, अभिजित देठे, शिक्षक विनोदकुमार भोंग, तृप्ती माने, आशा पाटील, कृष्णात कुंभार उपस्थित होते. या शाळेत उपनगरातील मुले शिकत आहेत.शाळेच्याा पटसंख्या वाढीसाठी, शाळेत विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत.