+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule31 Dec 22 person by visibility 706 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिर्डीहून परत येत असताना इचलकरंजीतील विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला शनिवारी (३१ डिसेंबर) पहाटे बारामती- फलटण रोडवर अपघात झाला. या अपघातात सत्तावीस मुली जखमी आहेत. त्यांच्यावर बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
इचलकरंजी येथील सागर क्लासेसच्या आठवी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची सहल औरंगाबाद, वेरूळ शनिशिंगणापूर, शिर्डी या भागात गेली होती. यशोदा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसने ४८ विद्यार्थिनी व पाच शिक्षक सहलीसाठी गेले होते. शिर्डीहून परत येत असताना शनिवारी पहाटे बारामती-फलटण रोडवर खाजगी बसचा अपघात झाला. पाहुणेवाडी गावानजीकच्या पुलावर हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून ओढ्यात गेली. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. तीन विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविले. जखमी विद्यार्थिनींच्यावर बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमदार रोहित पवार यांनी हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली