+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Aug 22 person by visibility 641 categoryगुन्हे
कोल्हापूर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
गहाळ आणि चोरीस गेलेले 26 लाख किमतीचे 267 मोबाईल कोल्हापूर पोलिसांनी अतिशय कौशल्याने तपास करत मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत दिले. पोलिसांच्या तपासाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
जिल्ह्यात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे, बाजारपेठा, मंडई, बस आणि रेल्वे स्थानके, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी मोबाईल चोरीच्या व गहाळ झालेल्या तक्रारी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मोबाईल चोरी तपासाचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक तानाजी सावंत सायबर कक्षाच्या फौजदार कोमल पाटील, अमर वासुदेव,सागर माळवे, रवींद्र पाटील , प्रदीप पावरा,यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल संचांचा तांत्रिक तपास करून मोबाईलचा शोध घेतला. चोरीस गेलेले मोबाईल हे कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कार्यरत होते. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे मालकांना कागदपत्रे तपासून मोबाईल देण्यात आले. आज बुधवारी पोलीस अधीक्षक बलकवडे, पोलीस निरीक्षक सावंत, फौजदार कोमल पाटील, यांच्या उपस्थितीत मूळ मालकांना मोबाईल प्रदान करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्यासह महेश गुरव, सागर राठोड, सुधीर पाटील, रवींद्र गाडेकर, विशाल पाटील, सुहास पाटील, अजय सावंत, संजय बेंडखळे, विनायक बाबर, दिलीप पोवार, रेणुका जाधव, पुनम पाटील, संगीता खोत यांनी तपासात सहभाग नोंदवला