महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
जिल्ह्यात कोरोनाने हळूहळू डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी, जिल्ह्यात कोरोनाचे ३४ रुग्ण सापडले असून त्यामध्ये कोल्हापूर शहरातील २१ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात जिल्ह्यातील रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. काल गुरुवारी कोरोना रुग्णसंख्या १४ इतकी होती. दरम्यान केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्वांना मोफत बुस्टर डोसची घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येणारी इतकी होती. पण आज आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांची संख्या जाहीर केली आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहरात सर्वात २१ रुग्णांची नोंद झाली आहे. हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी तीन, पन्हाळा आणि इचलकरंजी शहरात प्रत्येकी दोन तर शाहूवाडी आणि कागल तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रुग्णांवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सध्या तेरा रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.