+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Dec 22 person by visibility 392 categoryमहानगरपालिका
 येत्या सात दिवसात महानगरपालिकेचा परवाना घ्यावा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शहरातील यात्री निवास लॉजिग-बोर्डिंग  व्यवसायिकांनी येत्या सात दिवसात महानगरपालिका परवाना विभागाकडे रितसर अर्ज करुन परवाने घ्यावेत. अन्यथा महापालिका परवाना विभागाच्या वतीने तपासणी करतेवेळी विनापरवाना लॉजिंग-बोर्डींग व यात्री निवास सुरु असलेचे आढळलेस कारवाई करण्यात येणार आहे असे महापालिकेने म्हटले आहे
कोल्हापूर शहरामध्ये सुरु असणारे लॉजिंग बोर्डींग व यात्री निवास यांची महानगरपालिका परवाना विभागाकडून मागील काही दिवसापुर्वी तपासणी केली होती. त्यामध्ये परवाना नसलेले यात्री निवास सील केले होते. दरम्यान अशा व्यवसायिकांच्या सोईसाठी महापालिकेने दोन दिवसांचा विशेष कॅम्प घेऊन परवाने देण्याची कार्यवाही केली होती. परंतु या कॅम्पला ब-याच यात्री निवास व्यवसायिकांनी भेटी दिल्या. परंतु पुढील कोणतीही पुर्तता करुन घेतली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी अजूनही विनापरवाना लॉजिग-बोर्डींग व यात्री निवास सुरु असलेचे निदर्शनास येत आहे. तरी अशा सर्व व्यवसायिकांनी सात दिवसात रितसर परवाना घेऊन त्यांच्यावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.