+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Sep 22 person by visibility 435 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी : शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे समीकरण यंदाही कायम राहणार आहे. दसरा मेळाव्याच्या ठिकाणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले काही दिवस हा विषय प्रतिष्ठेचा ठरला होता. या विषयावरुन ठाकरे आणि शिंदे गटात आरोप, प्रत्यारोप सुरू होते. हा विषय हायकोर्टात गेला होता. हायकोर्टाने शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी पहिल्यांदा कोणी अर्ज केला अशी विचारणा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली.
 दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरच्या मागणीवरुन ठाकरे आणि शिंदे गटाच्या याचिका हायकोर्टात दाखल झाल्या होत्या. हायकोर्टाने ठाकरे यांच्या दसर मेळाव्याला परवानगी दिल्याने शिंदे गटासाठी धक्का आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर दसरा मेळाव्यावरुनही वाद निर्माण झाला होता. मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली होती. अखेर हा वाद कोर्टात पोहचला होता. शुक्रवारी यावर सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून २२ व २६ ऑगस्ट रोजी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्ककरिता अर्ज केले होते. मुख्यमंत्री शिंदे गटाकडून तीस ऑगस्टला अर्ज करण्यात आला होता. हायकोर्टाने शिंदे गटाची याचिका फेटाळली. यामुळे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार हे निश्चित झाले. पाच ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार आहे.