महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून सिद्धार्थ शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये कोल्हापुरातून सिद्धार्थ शिंदे यांची नियुक्ती केली आहे. ते अखिल भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष आहेत. या नव्या नियुक्तीबद्दल शिंदे यांचा कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सत्कार केला. कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी सिध्दोजी माने, सुनील दावणे, मोहन हजारे, संजय चौगले, अमोल शेंडगे, अनिल पाटील उपस्थित होते.