+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Jan 23 person by visibility 331 categoryसामाजिक
शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल :राजेश क्षीरसागर
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७  व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे शहरात 23 जानेवारी रोजी वेगवेगळ्या ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आयोजित या महाआरोग्य शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. शहरात बारा ठिकाणी महा आरोग्य शिबीरे झाली. यामध्ये नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. सुरुवातीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस राजेश क्षीरसागर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 दरम्यान या महा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी "राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होते. आम्हा शिवसैनिकांचे ते दैवत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे आचरण करून ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण या सूत्राचा अवलंब करून केलेल्या लोकोपयोगी कामामुळेच राजकारणात यशस्वी झालो आहे. अनेकवेळेला शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याचे आदेश दिलेच यासह यशस्वी झालेल्या लोकहिताच्या आंदोलनासाठी शाबासकी दिली. प्रसंगी सीमाप्रश्नी केलेल्या आंदोलनात स्वत: संवाद साधून पाठराखण करीत लढण्याचे पाठबळ दिले. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या विचारांची शिदोरी आम्हा शिवसैनिकांसोबत असून, त्यानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल सुरु आहे." याप्रसंगी बोलताना क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, "शिवसेनाप्रमुखांच्या मुशीत तयार झालेले धर्मवीर आनंद दिघे आणि धर्मवीर दिघेंच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय. सद्या ते राज्याची धुरा सांभाळत आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल सुरु आहे.सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे, समाजहिताचे काम आम्ही शिवसैनिक करू आणि हीच खरी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली असेल."   ‌‌यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, समन्वयक श्रीमती पुजाताई भोर, पूजा कामते, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, शिवसेना उपशहरप्रमुख सम्राट यादव, कपिल सरनाईक, निलेश हंकारे, रियाज बागवान, विभागप्रमुख ओंकार परमणे, उदय पोतदार, रविंद्र सोहनी, क्रिपालसिंग राजपुरोहित, बबनराव गवळी आदी उपस्थित-होते ‌