+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह
Screenshot_20240226_195247~2
schedule10 Jan 23 person by visibility 223 categoryराजकीय
खड्डे मुक्त कागल अभियानास प्रारंभ, ३६ लाख निधीतून महिनाभरात कागल होईल खड्डेमुक्त
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कागल शहरात खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. आमदार निधीच्या ३६ लाखातून महिनाभरातच कागल खड्डेमुक्त होईल, असेही ते म्हणाले.
   "खड्डेमुक्त कागल" या मोहिमेचा प्रारंभ आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. भाषणात मुश्रीफ म्हणाले, काही रस्ते तीन वर्षांपूर्वी झालेले आहेत. तसेच; काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ घेताना खड्डे पडलेले आहेत. संपूर्ण देशात सर्वांगसुंदर कागल करणे आणि स्वच्छतेच्या बाबतीत शहराला अग्रेसर ठेवणे, याला प्राधान्य दिले आहे.    
 केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या आधी राज्यात भाजप सरकार असताना आणि गेल्या सहा महिन्यात कागलला एक रुपयांचाही निधी मिळालेला मिळालेला नाही. विरोधकांचे कागलवरील हे बेगडी प्रेम आहे.       
 ....फेटे घातले म्हणजे ते सरपंच नव्हेत.........
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, 
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भाजपचे नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ठेवला होता. सत्कार समारंभात भाजपचे किती सरपंच आणि किती सदस्य निवडून आले आहेत, याचा आकडा सांगण्याचे धाडस त्यांना झाले नाही. २० टक्केसुद्धा सदस्य निवडून आलेले नसताना जनतेच्या डोळ्यात नुसती धुळफेक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या कामगारांनाही त्यांनी फेटे बांधले होते. फेटे बांधले म्हणजे ते सरपंच नव्हेत, अशी टीकाही त्यांनी केली.  दरम्यान व्यासपीठावर माजी आमदार के. पी . पाटील, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, मुख्याधिकारी श्रीराम पोवार, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गवळी, नामदेव पाटील, नवल बोते, एम . आर .चौगुले, संजय ठाणेकर, ॲड. संग्राम गुरव, संजय चितारी, अस्लम मुजावर, विवेक लोटे, अमित पिष्टे, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, सुनील माळी, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे उपस्थित होते.
 प्रवीण काळबर यांनी स्वागत केले. निशांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
...................