+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Jan 23 person by visibility 288 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर  प्रेस क्लब आणि शहीद शिक्षण प्रसारक मंडळ, तिटवे  यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ आणि होतकरू पत्रकारांसाठी मीडिया फेलोशिप देण्यात येणार आहे. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक,  आंतरराष्ट्रीय  शिक्षणतज्ञ आणि कोल्हापूर प्रेस क्लबशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले डॉ. जगन्नाथ पाटील यांनी जपान  सरकारसाठी सल्लागार म्हणून काम करत असताना दिलेल्या देणगीतून  या फेलोशिपची निर्मिती करण्यात आलेली आहे.  फेलोशिप ही दोन प्रकारांमध्ये देण्यात येईल. पहिली  फेलोशिप ही  वरिष्ठ पत्रकारांसाठी असून, गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अभ्यासपूर्ण आणि संशोधनावर आधारित अशा प्रकारची पत्रकारिता करून, वेगवेगळे सामाजिक, आर्थिक विषय समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांना ही फेलोशिप  देण्यात येणार आहे. या वरिष्ठ फेलोशिपसाठी निवड झालेल्या पत्रकारांना मानपत्र, त्याचप्रमाणे शहीद  शिक्षण संस्थेच्या वृत्तपत्र विभागामध्ये एक वर्षासाठी मानद प्राध्यापक  म्हणून निमंत्रित करण्यात येईल. होतकरू पत्रकारांसाठी असलेल्या दुसऱ्या विभागामध्ये देण्यात येणारी फेलोशिप ही पत्रकारितेमध्ये किमान दोन ते दहा वर्षांचा अनुभव असलेल्या, अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक पत्रकारितेची  कारकीर्द असलेल्या  होतकरू पत्रकारांना देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीचे स्वरूप मानपत्र आणि अकरा हजार रुपयाची रक्कम असे आहे. ही फेलोशिप   मिळालेल्या तरुण पत्रकारांनी एक वर्षामध्ये किमान सहा  संशोधन पर लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रातून किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून प्रसारित करणे अपेक्षित आहे. 
  फेलोशिप कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी मर्यादित आहे.  कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान देऊ शकतील  अशा सामाजिक प्रश्नांची मांडणी पुरस्कार करत्या पत्रकारांच्या लेखनामध्ये अपेक्षित आहे. तसेच देश व जगातील वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तम प्रथा कोल्हापूर मध्ये कशा आणता येतील या प्रकारचे नाविन्यपूर्ण लेखन देखील यामध्ये समाविष्ट होऊ शकते.  प्रेस क्लब आणि शहीद संस्था त्यांची संयुक्त निवड समिती आलेल्या नामांकनांमधून आणि अर्जांमधून फेलोशिपची निवड करेल.   यासाठी समन्वयक म्हणून प्रेस क्लबचे मोहन मेस्त्री, पत्रकार गुरुबाळ माळी व प्रशांत पालकर हे जबाबदारी सांभाळतील.
२०२३  सालासाठी या पुरस्कारांची नामांकने किंवा अर्ज 20 जानेवारी २०२३:पर्यंत कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांच्याकडे पाठवावीत असे आवाहन प्रेस क्लबचे अध्यक्ष या उपक्रमाचे समन्वयक मोहन मेस्त्री, गुरुबाळ माळी व शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोहन मेस्त्री  ९५२७३३९८०१,  गुरुबाळ माळी मो. 855101404,  प्रा. प्रशांत पालकर ७२१८१८००६६, यांच्याशी संपर्क साधावा. ई-मेल.-  svlm.titave@gmail.com वर माहिती उपलब्ध आहे