+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Jan 23 person by visibility 682 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
अनैतिक संबधास अडथळा केल्याप्रकरणी दीड लाखाची सुपारी देऊन धडावेगळे शीर करुन खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांनी आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अॅड समीउल्ला महंमदइसाक पाटील यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
 रवी रमेश माने (रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका), विजय रघुनाथ शिंदे (रा. नालासोपारा, ठाणे), किशोर दोडाप्पा माने (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, साळोखे पार्क), आकाश उर्फ अक्षय सीताराम वाघमारे (रा. १४ वी गल्ली राजारामपुरी), दिलीप व्यंकटेश दुधाळे (रा. माकवडवाला वसाहत, कावळा नाका), लीना नितीन पडवळे (रा. लाईन बाजार), गीताजंली विरुपाक्ष मेनशी (३०, शेवटचा बस स्टॉप,शांती नगर), मनेश सवण्णा कुचकोरवी (माकडवाला वसाहत, कावळा) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्यातील मुख्य आरोपी अमीत चंद्रसेन शिंदे (रा. विक्रमनगर व्यायामशाळेजवळ) हा मयत असून सतीश भिमसिंग वडर, (पाथरवट गल्ली, सायबर चौक), इंद्रजीत उर्फ चिल्या रमेश बनसोडे (रा. फ्रेंडस् कॉलनी झोपडपट्टी, कावळा नाका) हे आरोपी फरारी आहेत.
या खटल्याची माहिती अशी की आरोपी लीना नितीन पडवळे ही नितीन बाबासाहेब पडवळे याची दुसरी लग्नाची पत्नी होती. लीनाची गीतांजली विरुपाक्ष मेनशी ही मैत्रीण होती. या खटल्यातील आरोपी रवी रमेश माने याचे लीना पडवळे यांचे प्रेमसंबध होते. ते दोघे परस्पर भेटत होते. आपला पती नितीन पडवळे प्रेमसंबधात अडचण करुन सातत्याने मारहाण करत असल्याने त्याला संपवला पाहिजे असे लिना आणि रवीने ठरवले. त्यानंतर रवी माने याने अमित चंद्रसेन जाधव याला नितीन पडवळे याला ठार करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली. अमितने रवीचा खून करण्यासाठी अन्य साथीदारांना गोळा केले. त्यांनी ९ जानेवारी २०११ रोजी कावळा नाका येथील हॉटेल महाराजा येथे १०४ क्रमांकाची रुम आरक्षीत केली. तिथे सर्वांनी मिळून खूनाचा कट रचला. त्यानुसार कार्यवाही सुरू केली.
१२ जानेवारी रोजी लिनाची मैत्री गीताजंली मेनशी हिने लिनाचा पती नितीन पडवळे याला दुपारी साडेबारा वाजता आर.के.नगर येथील खडीच्या गणपतीजवळ बोलावून घेतले. नितिन आल्यावर गीताजंलीने त्याला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर रवी माने याने नितीन आर.के.नगरात आला आहे असा निरोप अमित शिंदे याला दिला. अमित अन्य सहकाऱ्यांसमवेत कारने आर.के.नगरात आला. नितीनला बेसबॉल स्टीकने मारहाण करुन त्याचे तोंड दाबून त्याला कारमध्ये कोंबले. त्यानंतर कारने त्याला वाठार येथे नेले. या गुन्ह्यातील मुख्य आरापी अमित शिंदे आणि रवी माने कार न जाता मोटार सायकवरुन वाठार येथे गेले. तिथे त्याने नितीनच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली आणि रवी माने याच्याकडे दिली. रवी माने वाठार परिसरातच थांबला.
त्यानंतर जखमी अवस्थेतील नितीन पडवळेला कारमधून कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरुन मलकापूर, विशाळगड आंबा मार्गे विशाळगड रोड मार्गे मानोलीच्या जंगलात वाघझरा येथे घेऊन गेले. त्यानंतर नितीन पडवळेला कारमधून बाहेर काढले. आरोपी अमित शिंदे याने चॉपरने नितीन पडवळेचे शीर धडावेगळे करुन खून केला. त्याचे कापलेले डोके, शर्ट, मोबाईल कॅरिबॅगमध्ये घालून धड खोल दरीमध्ये फेकून दिले. त्यानंतर अमित शिंदेने रवी मानेला फोन करुन तुझे काम झाले आहे. वारणानगर येथे मोटार सायकल घेऊन येण्याची सूचना केली. वारणानगर येथे आल्यावर अमित शिंदे खून करुन तोडलेले शीर बच्चे सावर्डे रोडवर जाणाऱ्या वारणा नदीच्या बंधाऱ्यावर जाऊन नदीत टाकले. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, चॉपर, बेसबॉल स्टीक, मोबाईल नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक डी.एस. घुगरे यांनी केला. त्यांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी त्यांच्या नऊ सहकाऱ्यांना अटक करुन कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
कोर्टात सरकारी वकील पाटील यांनी २१ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षातर्फ तपासण्यास आलेले सर्व साक्षीदार, पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आठ आरोपींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.