+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Nov 22 person by visibility 1426 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी स्नेहलता यांनी आत्महत्या केली आहे. रविवारी दुपारी सोलापूर नजीक सोरेगाव रोडवरील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. आत्महत्या करण्यापूर्वी स्नेहलता जाधव यांनी नातेवाईकांना फोन करून मी आत्महत्या करते असे कळविले होते.
 प्रभू व स्नेहलता जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबर रोजी लग्न होते. लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जाधव कुटुंब चडचणला गेले होते. शनिवारी रात्री उशिरा झाल्यामुळे त्यांनी सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमित्त लातूरला गेले. दुपारच्या सुमारास त्यांच्या पत्नी स्नेहलता जाधव या हॉटेलमध्ये एकटाच होत्या. त्यांनी नातेवाईकांना फोन केला. मी आत्महत्या करते असे कळवले. नातेवाईकांनी तत्काळ हॉटेलकडे धाव घेतली. हॉटेलमधील रूमचा दरवाजा बंद होता. नातेवाईकांनी दरवाजा तोडून रूममध्ये प्रवेश केला. तेव्हा स्नेहलता जाधव या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचे घोषित केले.या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.