+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !! adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा! adjustखासदार धैर्यशील मानेंचा कोडोलीत दौरा : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद adjustकोरे अभियांत्रिकीत युरेका जिज्ञासा २के २४ चे दिमाखात उद्घाटन adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको ? आमदार सतेज पाटलांचा मंडलिकांना सवाल adjustराधानगरीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले शाहू छत्रपतींच्या विजयासाठी -अभिजीत तायशेटे adjustफ्रान्समधील स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पाच खेळाडूंची निवड adjustसंजय मंडलिकांना विजयी करण्यास शहरवासीय सज्ज- राजेश क्षीरसागर
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Aug 22 person by visibility 418 categoryलाइफस्टाइल
 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठीतील असल बोलीभाषेतल्या इरसाल शब्दांचा चपखल वापर करुन बनलेले ' ए आबा घुमीव' हे गाणे यंदाच्या गणेशोत्सवात धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहे. मेलडी क्रिएटर्स या संस्थेने या गीताची निर्मिती केली आहे. मेलडी क्रिएटर्सचे सचिन बारटक्के,उद्योगपती प्रवीण शहा आणि संतोष पांचाळ यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
यंदाच्या गणेशोत्सवात तर हे गाणे गाजणार याची खात्री व्यक्त केली. मराठी भाषेच्या व्याकरणाच्या चौकटीत कुठेही न बसणारे पण ज्याचा उच्चार होताच लाल मातीतल्या रांगडया कोल्हापुरचे नाव आपोआपच ओठावर येते.अशा पद्धतीने कोल्हापुरात खास कोल्हापुरी मराठी बोलीभाषेतल्या इरसाल शब्दांचा सर्रास वापर केला जातो 'चालतय की' 'कूटबी हुडीक' 'ईषय हार्ड' 'चक्कीत जाळ', 'सप्पय गावलय', 'तिकाट जाळ', ' बददया पाऊस' 'फाष्टात', 'थर्ड मारतय', 'पुडया सोड' , 'बंद पड़', कोळसा वड'' अशा इरसाल बोलीभाषेतल्या शब्दानी कोल्हापुरी मराठी भाषेला स्वतःचे असे खास स्थान मिळवून दिले आहे. या शब्दांचा अचूक मिलाफ़ घडवत 'ए आबा घुमीव' हे गाणे आकाराला आले आहे.
सचिन बारटक्के यानी लिहिलेल्या या गाण्याला युवा संगीतकार शुभम साळोखेने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. साळोखे यांच्या स्टुडिओमध्ये हे गाणे ध्वनीमुद्रित केले आहे.या याण्याचे गीतकार सचिन बारटक्के, पुण्याचा गायक पार्थ कोठावले, आणि संतोष पांचाळ यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध केले आहे.