+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Jan 23 person by visibility 210 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
 सहकार विभागाने शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथील तीन खासगी सावकारांविरोधात कारवाई केली आहे.महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत ५० व १०० रुपयांचे स्टँप पेपरवरील सहा करारपत्र, नऊ खरेदीखते असे महत्वपुर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम सोळा अंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेकडे शिरोळ तालुक्यातील मौजे टाकळीवाडी येथील दोघांविरुध्द सावकारी अंतर्गत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये गैर अर्जदार धनपाल निगाणा भमाणे, सदाशिव धनपाल भमाणे व अजित आम्माण्णा गोरवाडे ( सर्व रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ) यांच्या विरुद्ध अवैध सावकारीची तक्रार दाखल केली होती. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मागर्दशनाखाली गैर अर्जदारांविरुध्द दोन ठिकाणी झडतीची कार्यवाही अधिन उप निबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले येथील सहकारी अधिकारी आर. जी. कुलकर्णी, व अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ येथील सहकारी अधिकारी व्ही. व्ही. वाघमारे यांच्या पथकाने पूर्ण केली. तथापि अजित आम्माण्णा गोरवाडे हे बाहेरगावी असल्याने त्यांचे राहते घर सिल करण्यात आले आहे. संशयित धनपाल निगाप्पा भमाणे व सदाशिव धनपाल भमाणे यांच्या राहत्या घरातून 50 व 100 रुपयांचे स्टँप पेपरवरील सहा करारपत्र, नऊ खरेदीखते असे महत्वपुर्ण दस्तऐवज जप्त केले.
या कारवाईत सहकार विभागाचे दोन अधिकारी व चौदा कर्मचारी पोलीस अधिकारी व चार पोलीस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली होती. झडतीमध्ये प्राप्त झालेल्या अवैध सावकारीचे दस्त ऐवज, करारपत्रे यांचे चौकशीचे काम सुरु आहे.
अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधण्याचे किंवा तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.