+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Jan 23 person by visibility 391 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
लक्ष्मीपुरी पोलिसांनी घरफोडी गुन्ह्यातील संशयिताला अटक करून अडीच लाख रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत केला. अमित उर्फ मयूर उर्फ बंटी सोपान भुंडे पाटील (मुळगाव पुणे सध्या राहणार पनवेल ) असे ह्या संशयिताचे नाव आहे.
 लक्ष्मीपुरी पोलिसांनी या तपासाची माहिती दिली. फुलेवाडी श्रीकृष्ण पार्क येथील उर्मिला शशिकांत आयरेकर यांच्या घरी आठ डिसेंबर 2022 रोजी चोरी झाली होती. चोरट्याने घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश करत मार्गशीष महिन्यातील लक्ष्मीपूजनातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण लंपास केले.याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
 लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक इकबाल महात यांच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीनुसार कराडमध्ये एक संशयित राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी संशयित बंटी भुंडे पाटील याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने फुलेवाडी श्रीकृष्ण पार्क येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई पोलीस उपनिरीक्षक इकबाल महात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजीत देसाई, रोहित मर्दाने, प्रतीक शिंदे, ईशाद महात, संजय कोळी, सुहास पाटील, संदीप कुंभार यशस्वी तपास केला.