+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती
Screenshot_20240226_195247~2
schedule31 Dec 22 person by visibility 193 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य केले होते. पवारांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने केली. तसेच  अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी अजित पवारांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर , सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी निषेध व्यक्त केला.  
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, "पवार घराणे कायम धर्मावरती राजकारण करत आले आहे, कधी आपल्या धर्मा विषयी चांगले बोललेले नाहीत. पवार कुटुंबाला महाराष्ट्राची जनता चांगलाच धडा शिकवेल यात शंका नाही. प्रत्येक वेळी जातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम पवार कुटुंबाने केले."
महेश जाधव म्हणाले, " पवार यांनी बोलताना जिभेवरती भान ठेवून बोलले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई हारलेली नाही."
यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्रानी, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, अमोल पालोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, विजय आगरवाल, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, रवींद्र मुतगी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजयसिंह खाडे-पाटील, प्रताप देसाई, सुभाष रामुगडे, सुजाता पाटील, महादेव बिरंजे, सुनील वाडकर, राजू जाधव, नरेश जाधव, अमर साठे, धीरज पाटील, विजय दरवान, डॉ. आनंद गुरव, अशोक लोहार, महेश यादव, रमेश दिवेकर, मानसिंग पाटील, दत्ता लोखंडे, ओमकार गोसावी, विवेक वोरा, राजेंद्र वडगावकर, गिरीश साळोखे, प्रणव पोवार, सुनील पाटील, सचिन जाधव, अमित टिकले, राहूल घाटगे, रोहित कारंडे, प्रकाश घाडगे उपस्थित होते.