+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Dec 22 person by visibility 3555 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
शालार्थ वेतन प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी ९० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाच्या कनिष्ठ लिपिकास रंगेहात पकडले. संदीप नारायण सपकाळ,(वय- 33 वर्षे, रा. एसएससी बोर्ड ऑफिस कॉटर्स रूम नंबर 5,कोल्हापूर, मूळ गाव डफळवाडी, ता.पाटण ,जिल्हा सातारा) असे त्याचे नाव आहे.
लाच लचपत विभागाच्या पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदार हा 46 वर्षाचा असून त्याची पत्नी कॉलेजमध्ये शिकवण्याचे काम करते. पत्नीचे नाव शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी कॉलेज कडून सांगली जिल्हा परिषदेतील शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभाग कडे पाठवण्यात आला. पत्नीचे नाव शालक शालार्थ वेतन प्रणाली मध्ये समाविष्ट झाले आहे का याबाबत त्यांनी कार्यालयाशी संपर्क केला असता येथील कनिष्ठ लिपिक संदीप नारायण सपकाळ यांनी तुमचे काम झाले आहे, कामाची ऑर्डर देण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे आज मंगळवारी २०;डिसेंबर रोजी तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची पडताळणी केली असता सपकाळ याने ९० हजार रुपयावर तडजोड झाली .शेंडा पार्क येथील कार्यालयाच्या बाहेर रिंग रोडवर ९० हजाराची लाच घेताना कनिष्ठ लिपिक संदीप सपकाळ याला पोलिसांनी रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, फौजदार संजय बंबरगेकर , हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक सुनील घोसाळकर , हेड कॉन्स्टेबल रुपेश माने, विष्णू माने यांनी कारवाईत भाग घेतला.